– राखी सना निमित्य प्रेमलता दीदीने केंद्रात उपस्थित सर्व सदस्यांना राखी बांधली.
कन्हान :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्याल य कन्हान सेवाकेंद्र येथे राखी सन (रक्षाबंधन) हा उत्सव उत्साही आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कामठी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी आणि संगीता रेवतकर यांनी राखी (रक्षाबंधन) च्या आध्यात्मिक महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले आणि उपस्थित बंधु-भगिनींना राखी बांधली. कन्हान सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी कविता दीदी यानी या प्रसंगी वाईट गोष्टींचा त्याग करून व्यसन मुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. बब्रुवान घोडमारे, सौरभ डोणेकर, कल्पना रोकडे, हर्षाली राठी, कृष्ण कृपाण, सुचिता राय, सुनीता कुंभळकर आणि वैशाली डोणेकर यांच्यासह बहु संख्येने बंधु-भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रसाद वाटप करून स्नेह संमेलनाची सांगता करण्यात आली.








