किशोर साहू, मौदा :- इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्थांचे अध्यक्ष राष्ट्रपाल गजभिये यांचा मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामधे लहान मुलाना राखी चे महत्व समजावुन सांगण्यात आले. मुलींनी घरून राखी बनवून आणली. मुलींनी मुलांना राखी बांधल्यानंतर मुलांनी मुलींना भेटवस्तू म्हणून चॉकलेट दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद शबनम शेख, आचल वाणी, भारती नारनवरे , संतोषी बरबते , नेहा पाल , निकिता कावरे यांनी परिश्रम घेतले.





