– ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या गावातील महिलांनी अरोली नवनियुक्त ठाणेदार मंगेश गोमासे यांना बांधल्या राख्या
किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत भांडेवाडी येथे शुक्रवार (ता.28 ऑगस्ट) ला रक्षाबंधनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अरोली पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ठाणेदार सागर गोमासे यांना सरपंच मंगला विष्णु देशमुख, सदस्य व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडी सावंगी शिवाडौली या तीनही गावातील अंगणवाडी सेविका, गावातील महिलांनी त्यांना शाल, श्रीफळ व राखी बांधून रक्षाबंधनच्या कार्यक्रम साजरा केला. 

याप्रसंगी ठाणेदार सागर गोमासे यांनी महिलांना सुरक्षा बाबत तसेच मोबाईल पासून होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले आणि आश्वासन दिले की ,कोणतेही समस्या तुमच्यावर आली तर तुमच्या भाऊ सागर गोमासे तुमच्या पाठीशी उभा आहे. कोणतीही समस्या माझ्यापर्यंत पोचली नाही, तरी महिला सरपंच असल्यामुळे ती समस्या तुम्ही सरपंचांना कळवा, त्या मला फोन करतील आणि तुमची समस्या सोडवायला मी लगेच आल्याशिवाय राहणार नाही. मी एवढा शब्द तुम्हाला याप्रसंगी राखीची भेट म्हणून देत आहे .
याप्रसंगी पोलीस अधिकारी श्याम सातपुते, अरोली पंचायत समिती गणातील भाजप नेते विष्णू देशमुख,पोलीस पाटील अरुण वाघाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता बानणगडे, खोमेश्वरी नागफासे , अंजिरा राऊत, ललिता मरसकोल्हे, सुमित मात्रे, कल्पना सलामे, सविता उईके, निर्मला काळसर्पे, शितल मोहुर्ले, इंदिरा कोलते , रेखा धुर्वे, ललिता परतेती, पुष्पा मंडाळी, निशा मंडाळी, मंदा वाडीभस्मे, शिला मात्रे, रंगु गेडाम,नेहा वरठी, शशिकला वाढवे, प्रमिला सलाम, दीपिका गेडाम ,दर्शना शेंडे, ललिता वाढवे, सुनीता वाढवे, कमला वाढवे, बबीता शेंडे, बबीता टेकाम, सुनिता वाढवे सह गावातील असंख्य महिला, मुली व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





