कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे स्वर्गीय राकेश कुमारची पूर्व उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, कामठी यांच्या २७ व्या स्मृतिदिनी रक्तदान करून त्यांच्या पावन स्मुर्तीला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षण पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर धोंडगे, सी.ई.ओ. , प्रमुख अतिथी किरण सावंदकर आईडिईएस, सीईओ कैन्टोनमेंट बोर्ड, कामठी, विशेष अतिथी डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माजी कुलगुरू , रातुम विद्यापीठ, नागपूर, प्राचार्य प्रो.डॉ. स्वप्नील दाहात, सचिव विजयकुमार शर्मा, कोषाध्यक्ष अभिमन्यू पोरवाल, अरिहंत पोरवाल, प्रशासकीय अधिकारी प्रो.डॉ. विनय चव्हाण, संयोजिका डॉ. गिजाला हाश्मी उपस्थित होत्या.
स्वर्गीय राकेश कुमारजी पोरवाल यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार व पुष्पांजली वाहून व श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रास्ताविकात प्राचार्य प्रो. डॉ. स्वप्नील दाहात म्हणाले कि स्व. राकेशजी नेहमी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात सेवाभाव आणि मूल्य जपण्याचा सल्ला देत त्याच तत्वाला धरूनच आमचे महाविद्यालय मार्गक्रमण करीत आहे. प्रमुख पाहुणे डॉ. सिद्धार्थ विनायक यांनी मानवी उत्क्रांतीवर प्रकाश टाकतांना मानव शरीर, मन, बुद्धीसोबतच वर्तमान काळात मोबाईल, एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुखाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नरत असून हे सुख मानवाला शिक्षणातून मिळाले असे मत व्यक्त केले. विशेष अतिथी किरण सावंदकर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवून खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण करण्याचे काम करीत असून विद्यार्थ्यांना कौशल्य आणि मूल्याचा योग्य वापर करण्याचे आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर धोंडगे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आमच्या महाविद्यालयाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून त्याच्या विकासासाठी महाविद्यालय सदैव तत्पर आहे.
याप्रसंगी डॉ.गजाला हाश्मी संपादित महाविद्यालयाचा वार्षिकांक “केसरी”चे विमोचन तसेच स्वर्गीय राकेश कुमारजींच्या स्मृतिप्रीत्यार्थ डॉ. विनोद शेंडे, निशिता अंबादे व लेफ्टनंट मोहम्मद असरार यांच्या नेतृत्वात डॉ. आशिष खंडेलवाल, डॉ. श्वेता खंडेलवाल यांच्या जिएसके ब्लड बँक, नागपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले ज्यात पोरवाल परिवार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मिळून २५ लोकांनी रक्तदान केले. महाविद्यालाचे माजी विकास निदेशक स्व. अशोक कुमार भाटीया यांच्या स्मरणार्थ श्रीमती रजनी भाटीया व मुलगा आदित्य भाटीया यांच्यातर्फे कनिष्ठ महाविलायाच्या विद्यार्थ्यांसाठी १० संगणक दान देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. इफ्तेखार हुसैन, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. तुषार चौधरी, डॉ. जितेंद्र सावजी तागडे, डॉ. महेश जोगी, डॉ. जयश्री ठवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विश्वनाथ वंजारी, पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे, प्रा. स्वाती निंबाळकर, प्रा. एस. एस. माकडे, रजिस्ट्रार स्वप्नील राठोड, किशोर गबड, सुनील भालकर, प्रवीण अंबादे, मंगेश यादव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ.प्रियंका भोयर व डॉ. हिना कौसर तर आभार डॉ.गजाला हाश्मी यांनी केले.





