spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवयुवक उच्च प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचा उपक्रम उत्साहात संपन्न

कामठी :- नवयुवक उच्च प्राथमिक शाळा गौतमनगर कामठी या शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला . शाळेत राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुंदर व आकर्षक राख्या तयार केल्या . या राख्या मुलींनी मुलांना ओवाळून हाताला बांधल्या . मुलांनी भेट म्हणून चाकलेट मुलींना दिले व भावांनी बहिणीचे रक्षण देण्याचे वचन दिले ,अशाप्रकारे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार , दिलीप मस्की , राजकुमार शेन्डे , राखी बागडे , दिक्षा फुले व विभा सोनडवले उपस्थित होते .


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.