spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेड येथे सोनजारी समाजासाठी 60 जात प्रमाणपत्रांचे वितरण

 

उमरेड ८ – उमरेड येथे सोनजारी समाजाच्या 60 जणांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

सोनजारी समाज हा आजही मुख्य प्रवाहापासून वंचित असून, समाजात शिक्षणाचे प्रमाण तुलनेत कमी आहे. भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांतच्या वतीने समाजातील नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली.

कार्यक्रमात  दुर्गादासजी व्यास यांनी भटके समाजाशी संवाद साधला. रामटेक विभागाचे संयोजक प्रवीण जगताप यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

उमरेडचे उपविभागीय अधिकारी (SDO) विद्यासागर चव्हाण यांनी समाजातील नागरिकांशी थेट संवाद साधून सांगितले की, “ज्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल, ती मी तात्काळ उपलब्ध करून देईल .” त्यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य दिले.

या कार्यक्रमाला दुर्गादासजी व्यास (अखिल भारतीय घुमंतू कार्यप्रमुख), डॉ. रोहितजी मांडेवार (संपर्कप्रमुख, विदर्भ प्रांत), प्रवीण जगताप (रामटेक विभाग संयोजक), बाबाराव तोडवाल, गणेशजी उमाळे (जिल्हा प्रचारक, उमरेड), मिथलेशजी शुक्ला, चंद्रशेखर भिवमारे, चांगदेव गजफरे, शंकर रोहणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular Articles