spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेडमध्ये “श्रावण क्वीन स्पर्धा 2025” उत्साहात पार – विवाहित महिलांचा मनमोहक सहभाग

 

उमरेड ८ : अक्षय ज्वेलर्स आणि अक्षय फॅशन ज्वेलरी, उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “श्रावण क्वीन स्पर्धा 2025” दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी उमरेड येथील बालसोन लॉन येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 25 विवाहित महिलांनी भाग घेतला होता, तर 400 हून अधिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निकिता वाघमारे, द्वितीय क्रमांक भारती बंडे, तृतीय क्रमांक संचिता कुर्जेकर यांनी पटकावला, तर शिखा शर्मा आणि पद्मा तवले यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. परीक्षण प्रवीणा दाढे, वैशाली वाघमारे आणि बाशुली चढ्ढा यांनी पार पाडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा पारवे, योगिता इटनकर, वसुधा खंते, अल्का रेवतकर, सुषमा लाखे, नम्रता आसटकर आणि श्रद्धा रहमतकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन किरण आष्टणकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुही खानोरकर, राजश्री सातव, सरला मुळे, शुभांगी पिसे, मेघा साठवणे, शारदा भरतकर, वैशाली भोजेकर आणि राखी वज्जलवार यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय ज्वेलर्सचे संचालक अक्षय खानोरकर यांनी उपस्थितांचे आणि सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.

Popular Articles