spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७ सराईत गुन्हेगार हद्दपार; नागपूर पोलिसांची निर्णायक कारवाई

 

नागपूर ८ : पोलीस उप आयुक्त निकेतन कदम यांनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या एकूण ७ सराईत गुन्हेगारांना हद्दपारीची कारवाई करत नागपूर शहर व जिल्ह्यातून बाहेर काढले. हद्दपारीचे आदेश मिळालेले गुन्हेगार पुढीलप्रमाणे आहेत – १) साबुद्दीन उर्फ साबु समसुद्दीन पठाण (वय ४६), रा. तंबाखु ओली, जुनी कामठी, २) लक्ष्मी विजय डोंगरे (वय ३६), रा. कुंभारे कॉलोनी, नविन कामठी, ३) रितेश दिगांबर मेश्राम (वय ४०), रा. भिमनगर, गवळीपुरा, नविन कामठी, ४) संगीता संतोश वर्मा (वय ३५), रा. देवी नगर, वांजरा, कळमना, ५) लता प्रविण गेडाम (वय ४२), रा. गुलमोहर नगर, कळमना, ६) प्रतिभा संतोश यंचलवार (वय ४५), रा. गोंडपुरा, भांडेवाडी, पारडी आणि ७) सुशीला उर्फ भुरी उर्फ नागीन तुलसीदास चंदेल (वय ४०), रा. धरम नगर, संत्रावाडी, कळमना. या सर्व आरोपींनी दहशत निर्माण करणे, लोकांना दमदाटी करणे, संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, अवैध दारू, अंमलीपदार्थ विक्री, दरोड्याची तयारी, प्राणघातक शस्त्रे बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन, इ. स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले असून, त्यांच्या कृत्यामुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पूर्वीही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती, मात्र कोणतीही सुधारणा न झाल्याने, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मा. पोलीस उप आयुक्त कदम यांनी या सातही गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे आदेश पारित केले. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली असून त्यांना नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील कन्हान, मौदा व खापरखेडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षिरसागर (कामठी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे (कळमना), महेश आंधळे (नवीन कामठी), नंदा मनगटे (पारडी), प्रशांत जुमडे आणि पो.उ.नि. मिलींद मेश्राम (जुनी कामठी) यांच्या समन्वयातून करण्यात आली.

Popular Articles