spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सट्टा जुगारावर छापा, १२ आरोपी अटकेत; ७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त  

 

नागपूर ८ : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस उप आयुक्त परीमंडळ ५ यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत झाडीझुडपात सुरू असलेल्या सट्टा जुगारावर छापा टाकला. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास पोलीस उप आयुक्त  निकेतन कदम यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आकाश टेंभुर्णे नावाचा इसम समता नगर नाल्याच्या बाजूला झाडीत सट्टा खेळवित आहे. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने पंचासमक्ष त्या ठिकाणी धाड टाकली असता, आकाश टेंभुर्णे (३३), मेकोसाबाग नागपूर याला अटक करण्यात आली. त्याच्या मदतीने अनिल नंदनवार (६७), अनमोल रामटेके (३९), योगेंदर शाहू (४५), गणेश धुर्वे (३०), दिनेश धुर्वे (२८), प्यारेलाल सरोटे (४५), पवन सहारे (५८), छोटेलाल कोटांगळे (६९), मनोज मेश्राम (५६), कैलास ठाकुरे (४५) आणि शामराव बोरकर (५५) या १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून रोख रक्कम ₹८,९४८, ११ मोबाईल, सिट्रॉन सी-३ चारचाकी कार, ३ दुचाकी, कॅल्क्युलेटर आणि सट्टा खेळविण्याचे साहित्य असा एकूण ₹७,५१,९०८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पोलिस ठाणे जरीपटका येथे कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना मुद्देमालासह पोलिस ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अरुण क्षिरसागर, पोउपनि. सचिन वाकलेकर, पोहवा. अरुण चांदणे, पो.अं. देवेंद्र विजयवार, सचिन टांगले, अश्विन जाधव, मोहन पराडकर यांच्या विशेष पथकाने केली. सध्या पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles