spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मंदिरात तरुणीवर जीवघेणा हल्ला: आरोपी फरार, पीडितेवर गंभीर उपचार सुरू

 

नागपूर ८ : नागपूरच्या गुमठी गावात गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. हनुमान मंदिरात पूजेसाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीवर, तिच्या प्रेमात वेड्या झालेल्या रोशन दीपक सोनेकर (३२) या विवाहित तरुणाने भाजी कापणाऱ्या चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या हाताची चार बोटे पूर्णतः कापली गेली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

रोशन हा पीडित तरुणीचा गेल्या काही वर्षांपासून पाठलाग करत होता. दारूच्या आहारी गेलेला हा युवक तिच्यावर सतत मानसिक त्रास देत होता. यापूर्वीही २५ एप्रिल २०२५ रोजी त्याने कोराडी नाका येथे तिला त्रास दिला होता, तसेच घरात घुसून मारहाण केली होती. त्या वेळी तक्रार दाखल झाली होती, परंतु कठोर कारवाई न झाल्यामुळे त्याचे धाडस वाढले.

या सततच्या त्रासामुळे तरुणीला बीएससी नर्सिंगचे शिक्षण सोडावे लागले होते. हल्ल्यानंतर ती रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहोचली व तिला तातडीने नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची स्थिती चिंताजनक आहे.

खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले असून त्याचा शोध सुरू आहे.

Popular Articles