spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडचिरोली तालुक्यातील 39 निराधारांना मिळणार अर्थसहाय्य 

– गडचिरोली तालुका- संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक

 गडचिरोली :- विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसहय करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्याकरिता गडचिरोली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यात अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन भरुन घेण्यात येतात.

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत माहे ऑगष्ट, 2026 मध्ये ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज दिनांक 31 ऑगष्ट, 2026 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती, गडचिरोली समोर ठेवून समितीचे अध्यक्ष यश कोंडावार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यांत आली. सदर सभेला उषा कैलास बन्सोड, सदस्य, शितल बन्सोड, सदस्य, वसंत गावतुरे, सदस्य, संदीप जिवन शिंगाडे, सदस्य, दत्तु माकोडे, सदस्य, आकाश सातपुते, सदस्य, प्रमोद सुधाकर उमरगुंडावार, शंकर नैताम, सदस्य, तसेच अनिकेत पाटील, संवर्ग विकास अधिकारी, गडचिरोली व सुर्यकांत पिंदुरकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते.

सदर सभेत पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण 26 मंजूर प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 13 प्रकरणे मंजूर असे एकूण 39 प्रकरणे मंजूर करण्यात आले.

सदर सभेकरिता डि. ए. ठाकरे, नायब तहसिलदार (सं.गां.यो.) तहसिल कार्यालय, गडचिरोली, अमोल नन्नावरे, सहा. महसुल अधिकारी, एस. जे. नरुले, महसुल सहाय्यक, कु. रंजनी डोंगरे डाटा एन्ट्री ऑपरेटर, यांनी विशेष सहाय्य योजनेची ऑनलाईन प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्याचे अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन तहसिल कार्यालयास सादर करणेबाबत तहसिलदार, गडचिरोली सागर कांबळे यांनी आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.