spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अहिल्या किड्स प्री-स्कूल मध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी

भोसलेवाडी, हिंगणा :- सरदार मल्हार होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत अहिल्या किड्स प्री स्कूल, भोसलेवाडी, हिंगणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राधा-कृष्णाच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव चंद्रकला उरकुडे, तसेच संस्थेच्या सदस्य प्रीती धोटे व सुनीता चतुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, धैर्य, सदाचार व कर्मनिष्ठेचे महत्त्व सांगितले. बालवयातच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व सण- उत्सवांची ओळख व्हावी, या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्री- स्कूलच्या प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण कृष्णमय झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.