spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इंडेनच्या बुटीबोरी प्लांटमध्ये अग्निशमन दलाचे मॉक ड्रिल

नागपूर,  ता. ८  : इंडीयन ऑईल कार्पोरेशन लिमीटेडच्या (आयओसीएल) बुटीबोरी एमआयडीसीतील एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्यक्षिके करून दाखविली.

नागपूर महानगरपालिकेच्या नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रातील जवानांनी या प्रत्यक्ष सरावात सहभाग घेतला. यावेळी नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राचे प्रमुख मरसकोल्हे, राठोड, झाडे व हादवे यांच्या मार्गदर्शनात ही प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. बुटीबोरी येथील ढवळपेठ येथे आयओसीएलचा एलपीजीचा बॉटलिंग प्लांट आहे. या प्लांटमध्ये संभाव्य अनुचित घटना घडल्यानंतर करावयाच्या उपाययोजना तसेच प्राणहानी कमीत कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी करून दाखविले. या बॉटलिंग प्लांटमध्ये वायू गळतीसारखे प्रकार होऊ शकतात, अशा घटना घडल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांचा सरावही यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी केला.

Popular Articles