मनपातर्फे झोपडपट्टी धारकांकरिता मालमत्ता कर अभय योजना-2025
नागपूर महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय: झोपडपट्टीतील लाखो मालमत्ता धारकांना होणार लाभ
नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील वन विभाग वगळून महाराष्ट्र शासनाच्या, निमशासकीय, खाजगी मालकीच्या, मालकीच्या जागेवरील नागपूर महानगरपालिका मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील झोपडपट्टीधारकांना नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या, खाजगी मालकीच्या जागेतील अधिसूचित झोपडपट्टीतील सर्वांसाठी घरे योजनेच्या लाभ मिळण्याकरीता झोपडपट्टी धारकांच्या भाडेपट्टे असलेल्या मालमत्ता कर रक्कमेवरील शास्ती रक्कम 100 टक्के माफ करण्यात येत आहे. झोपडपट्टीतील थकित मालमत्ता करावरील दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा शहरातील झोपडपट्टीतील लाखो रहिवाशांना होणार आहे. ही योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी झोपडपट्टीधारकांना थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. असे आदेश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेतर्फे “सर्वांसाठी घरे-२०२२” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरीता मनपाच्या मालकीच्या जागेवरील, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय विभागाच्या मालकीच्या (वन विभाग वगळून) नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमित झोपडपट्ट्यातील अतिक्रमणे नियमित करण्यात येत आहे. अशा नियमित झालेल्या झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टा देण्याकरीता अशा जागेवरील जागा/झोपडी/ घर करीता थकीत असलेल्या मालमत्ता करावरील आकारलेला दंड माफ करण्याकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनानुसार अभय योजना-२०२५ जाहीर केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
“सर्वांसाठी घरे-२०२२” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे हेतू महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढले आहे. विविध शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेले भुखंड नियमानुकूल करण्यास पात्र आहेत.
थकीत मालमत्ता कर रकमेवर लागलेली शास्ती रक्कम माफ करण्याबाबत अधिकार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना आहेत. अभय योजना लागू असलेल्या काळात अतिक्रमित असलेल्या झोपडपट्ट्यातील करकरदात्यांकडून नागपूर महानगरपालिकेस घेणे असलेल्या मूळ रक्कमेचे १०० टक्के अधिदान केल्यास थकीत रक्कमेवर प्रतिमाह २ टक्के आकारण्यात आलेला दंड, जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क व वसुलीचा खर्च पूर्णतः माफ करण्यात येईल. ही योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या योजनेअंतर्गत मागणी किंवा दावा करता येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.
या अधिकारानुसार अतिक्रमित झोपडपट्टयातील अतिक्रमणधारकांनी/झोपडीधारकांनी निव्वळ मालमत्ता कराची रक्कम भरण्याकरीता, मालमत्ता करावर लागलेली शास्ती/दंड माफीची अभय योजना-२०२५ राबविण्याचा मनपाच्या कर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.
सदहूं अटीची पूर्तता होणेकरीता वरील जागेवरील अतिक्रमणधारकांकडून अद्यावत मालमत्ता कर रसीद हे एक दस्ताऐवज महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक झोपडीधारकाने मालमत्ता कर महानगरपालिका निधीत जमा करुन अद्यावत मालमत्ता कर रसीद प्राप्त करून घ्यावी तसेच भाडेपट्टा मिळण्याकरीता असलेल्या अटी ची पूर्तता झोपडीधारकांना करावी लागणार आहे.
अभय योजनेचा कालावधी दि.०१ ऑगस्ट २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत असणार आहे.
झोपडपट्टी क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना / झोपडपट्टीवासियांना भाडेपट्टा देणे अपेक्षीत आहे, अशाच अतिक्रमणधारकाच्या भोगवटयातील जागा / झोपडी/घर या करीता मालमत्ता कर रकमेच्या थकीत रक्कमेवरील शास्ती व दंडाची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येईल.
अभय योजना-२०२५ लागू असलेल्या काळात फक्त अतिक्रमित असलेल्या झोपडपट्टयातील कर दात्यांकडून नागपूर महानगरपालिकेस घेणे असलेल्या मुळ रकमचे १०० टक्के अधिदान केल्यास थकीत रकमेवर नियम ४१ अन्वये प्रतिमाह २ टक्के आकारण्यात आलेला दंड व नियम ५० खालील जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क किंवा वसुलीचा खर्च पुर्णतः माफ करण्यात येईल.
अभय योजने अंतर्गत सवलतीस पात्र असलेल्या रक्कमा सदर योजना ही नमूद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रकमांनाच लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या रकमांना लागू राहणार नाही. योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या योजने अंतर्गत मागणी/दावा करता येणार नाही.




