spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डीसीपी पथकाने केले कत्तलीच्या संशयातून ११० गोवंशीय बैल जप्त!

– गादा-नेरी मार्गावरील शेतात पोलिसांचा छापा; १९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

कामठी :- गादा गावातील गादा-नेरी मार्गावरील एका शेतात चारा-पाण्याची व्यवस्था न करता तब्बल ११० गोवंशीय बैल क्रूरपणे बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. डीसीपी पथकाच्या नवीन कामठी पोलिसांनी छापा टाकून सर्व जनावरे ताब्यात घेतली. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी मुश्ताक कुरेशी (रा. कामठी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कारवाईनुसार, गादा ते नेरी रोडवरील खसरा क्रमांक १८ मधील शेतात मोठ्या संख्येने गोवंशीय बैल बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी ११० बैल कोणतीही पुरेशी चारा व पाण्याची व्यवस्था नसलेल्या स्थितीत आढळून आले.

पोलिसांनी पंचनामा करून सर्व जनावरे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय बैलांची अंदाजे किंमत १९ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९९५ मधील कलम ५(ब), ९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(फ), (ह), (आय) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.