spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जवाहरनगर पोलिसांची अवैध हातभट्टीवर कारवाई

हंसराज,भंडारा जवाहरनगर :- जवाहरनगर पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती व मोहफुलाच्या साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करत एकूण १० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई भंडारा तालुक्यातील लोहारा आणि संगम बेट परिसरात करण्यात आली.

पहिल्या कारवाईत लोहारा शेतशिवारातील नाल्याच्या काठावरून पोलिसांनी २३ प्लास्टिक पोत्यांमध्ये भरलेले एकूण ४६० किलो सडवा मोहफास, अंदाजे पाच मन जळाऊ काळे लाकूड आणि तीन लोखंडी ड्रम असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी अभिमन्यू निलकंठ उके, वय ४८ वर्षे, रा. लोहारा, याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४११/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत संगम बेट परिसरातून आरोपी रूपेश प्राणहंस मेश्रराम, वय ४५ वर्षे, रा. संगम पुनर्वसन, याच्याकडून ५२ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये भरलेला १,५६० किलो सडवा मोहफास, ४० लिटर हातभट्टी दारू, दोन लोखंडी ड्रम, अंदाजे १०० किलो जळाऊ लाकूड आणि दोन जर्मन कटोरे असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ)(ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

तिसऱ्या कारवाईत संगम बेट परिसरातून आरोपी विशाल विलास खंगार, वय २६ वर्षे, रा. कौतुकनगर, तिड्डी, याच्याकडून १३ प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला १,९५० किलो सडवा मोहफास आणि १३ प्लास्टिक ड्रम असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४१४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या कारवाईत आरोपी मनोज रामचंद्र मेश्रराम, वय अंदाजे ५५ वर्षे, रा. संगम पुनर्वसन, याच्याकडून ३२ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये भरलेला ९६० किलो सडवा मोहफास जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत १ लाख ९२ हजार रुपये असून, याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

ही कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चुटे, पोलीस शिपाई नारनवरे, पोलीस शिपाई तिडके व जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.