– जंतनाशक गोळ्यांचे वाटप
बेला :- मराठ वऱ्हाड दुग्ध उत्पादन संस्थेच्या वतीने चारगाव येथे किसान जागरूकता बैठक घेण्यात आली.महिला शेतकर्यांचा दुग्ध व्यवसायाकडे कल वाढवून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच दूध उत्पादनात वाढ घडवून आणणे.जहा या बैठकीचा हेतू होता.
यावेळी चारगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. पवन भागवत यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.अधिकाधिक महिलांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले.या मेळाव्यात गावातील प्रत्येक महिलेने गांडूळ खत प्रकल्प उभारून गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा “चारगाव ब्रँड” विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मराठ वऱ्हाड दुग्ध उत्पादन संस्थेचे व्यवस्थापक जितेंद्र वैद्य यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांचे फायदे आणि पशुपालकांसाठी उपलब्ध सुविधा याबाबतची माहिती देत दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले. दरम्यान,दूध उत्पादकांना प्रोत्साहनपर मिनरल मिक्स्चर व जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विभागीय अधिकारी मनीष गिरडकर, इनपुट ऑफिसर पौर्णिमा मेश्राम, पीआयबी अधिकारी रुपेश नेवारे, सहाय्यक योगेश नेवारे, चारगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदू लूचे, मारुती नरड यांच्यासह चारगाव व खापरी परिसरातील महिला,पुरुष दुग्ध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





