spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोवाड शहरात पोळा सन उत्साहात

– काळानुसार बैलजोडीची संख्या कमी 

– आधुनिक शेती मुळे पोळा सणावर फटका

मोवाड :- स्थानिक मोवाड शहरातील आठवडी बाजारात नगर परिषद कडून बैल पोळा चे आयोजन केले होते. आधुनिक युगात बैल जोडी चे प्रमाण कमी होत चालले आहे. एके काळी मोवाड शहरात जावपास २५०- ३०० बैल जोड्या असलायच्या मात्र पण आता ६४ बैल जोडया शहारात शिल्लक राहिल्या आहे. मातीत वर्षभर काम करणाऱ्या आपल्या जोडीला साजवून शेतकऱ्यांनी तोरणात आणले होते. शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राज्याला सजवून तोरणात आणले होते. उत्कृष्ठ सजावट करणाऱ्या बैल जोडीला बक्षीस देण्यात आले. या मध्ये सजावट केल्याल्या व धस्ठपुस्ठ बैल जोडी मालकाचा सत्कार करून बक्षीस देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दर्शना ढोरे , उपाध्यक्ष रवी मालोदे , नगरसेवक ललित खंडेलवाल , अंकुश घावडे , हिराचंद कडू , विवेक लिखार , दिनेश पांडे उपस्थित होते. यावेळी बैल पोळा पाहायला मोठ्या संख्येने गावातील नागरिक , पोलिस कर्मचारी , नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे शहराबाहेर नोकरी वर असणारे तरुण , जेष्ठ , बालगोपाल मोठ्या संख्येने शहरात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.