spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संरक्षण विभागाच्या मदतीने पाच युद्धातील शूरवीरांची साकारणार वीरगाथा

मनपाच्या टेकडी रोडवरील युद्ध स्मारकाला प्रशासकीय मान्यता

नागपूर,ता. ९  : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या चार प्रमुख युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या तसेच शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांची वीरगाथा साकारणारे युद्ध स्मारक टेकडी रोडवरील संरक्षण विभागाच्या जागेवर उभारण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या युद्ध स्मारकामध्ये सन १९४८ चे भारत- पाकिस्तान युद्ध, सन १९६२ चे चीन युद्ध, सन १९६५ चे पाकिस्तान युद्ध, सन १९७१ चे बांगलादेश युद्ध व १९९९ चे कारगिल युद्धात देशासाठी शौर्य गाजविणाऱ्या व शहीद झालेल्या वीरांची गाथा साकारली जाणार आहे.

Popular Articles