spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगरचे कुस्ती स्पर्धेत दमदार यश

– चार विद्यार्थ्यांची पदकांची कमाई; विभागीय स्पर्धेसाठी निवड

नागपूर :- मनपा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम ठेवली. मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या १० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी विविध वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील वयोगटात गौरव कोहाड याने ९२ किलो वजनगटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. याच वयोगटातील वेदांत मते याने ६० किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले. १४ वर्षांखालील वयोगटातही प्रहार मिलिटरी स्कूलच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. स्वस्तिक बागडे याने ४१ किलो वजनगटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक, तर वेदांत बालबुधे याने ५७ किलो वजनगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी आक्रमक व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी खेळाडूंना चितपट केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या वंदना कुळकर्णी तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि क्रीडाशिक्षक गौरव चुरागले यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आगामी विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.