spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यशोदा केंद्रांतर्गत मुख्याध्यापकांची आढावा सभा उत्साहात

नागपूर :- यशोदा केंद्रांतर्गत मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषय व उपक्रमांवर आधारित आढावा सभा १५ सप्टेंबर रोजी यशोदा प्राथमिक शाळा, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नागपूरचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज पाटील होते. यावेळी अशोक डोहे , U.R.C.-1, कबीर मेश्राम, विस्तार अधिकारी उमरेड, अभिजित राऊत, समन्वयक, हर्षाली खर्चे, संचालिका Snik Foundation तसेच सारिका दहापुते, विशेष शिक्षिका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभिजित राऊत यांनी दिव्यांग प्रवर्गाची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले. हर्षाली खर्चे यांनी दिव्यांग मुलांच्या दैनंदिन व्यवहारातील अडचणी, त्यांच्याशी संवेदनशीलपणे कसा व्यवहार करावा आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शाळांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. त्या गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. तसेच सारिका दहापुते यांनी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि योग्य जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. सभेत शाळांमधील शैक्षणिक कामकाज, विविध उपक्रमांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा व आढावा घेण्यात आला. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या विविध गरजा समजून घेऊन शाळास्तरावर प्रभावी उपक्रम राबविण्यासाठी नवी दिशा मिळाली. आढावा सभेचे आयोजन बेलसरे मॅडम केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापिका यशोदा प्राथमिक शाळा यांनी केले प्रस्तावना व संचालन शरद उरकुडे तर आभार प्रदर्शन नारनवरे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.