spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नरसाळा येथील युवक यश जगदीश गजभिये यांची आज महसूल सहाय्यक पदी निवड

किशोर साहू, मौदा :- तारसा – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील व गट ग्रामपंचायत नरसाळा अंतर्गत येणाऱ्या नरसाळा येथील युवक यश जगदीश गजभिये यांची आज मंगळवार (ता. 15 सप्टेंबर) ला एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झाली.

यश गजभिये यांनी घेतलेल्या कठीण परिश्रम व चिकाटीमुळे त्यांना यश आल्याने, गावकऱ्यांनी आज त्यांच्या नरसाळा येथील राहत्या घरी जाऊन त्यांच्या गळ्यात फुलांच्या हार टाकून व गुलाल लावून त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य परसराम घारड, अश्विन मेश्राम, नामदेव ठाकरे, दीपक गजभिये, अविनाश वाहने, सुरेश मेश्राम, मोतीराम गजभिये सह ग्रामस्थ उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.