किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडी (टोला )येथे मागील 34 वर्षांपूर्वी पासून न्यू बाल मित्र गणेश उत्सव मंडळातर्फे सुरू असलेले गणेश उत्सव यंदा 35 व्या वर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन उत्साहात व शांततेत सुरू आहे.
गणेश उत्सवाच्या यशस्वीतेसाठी न्यू बाल मित्र गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष जीवन मारोती राऊत, विजय भाऊराव नेवारे ,महेश लक्ष्मण भोयर, दुर्गेश दामोधर वघारे ,योगेश परमेश्वर राऊत, उज्वल भारत राऊत, सुमेश राजेंद्र काळसर्पे, मनोज प्रभाकर वघारे, निखिल विष्णू राऊत, सुशील परमेश्वर राऊत, कैलास बाजीराव राऊत परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.





