spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पाच बकऱ्या चोरणारा एक आरोपी अटकेत

– चारचाकी वाहनासह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई

कन्हान :- शहरातील सुपर टाऊन, प्रभाग क्रमांक २ येथील वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्या घरालगत असलेल्या बकऱ्यांच्या कोठ्यातुन पाच बकऱ्या चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रा मीणच्या पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्या कडुन गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि बक ऱ्या विकुन मिळालेले रोख पैसे असा एकुण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार मंगळवार (दि.१५) सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हौसालला पुंड यांच्या घरालगत असलेल्या बकऱ्यांच्या कोठ्यातुन अज्ञात चोरट्यांनी पाच बकऱ्या चोरून नेल्या. चोरी झालेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत १ लाख रुपये होती. याप्रकरणी पुंड यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६५८/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन सुरू अस तांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसां नी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुल पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्या तुन बकऱ्या विकुन मिळालेले रोख २० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली हुंडाई आय-२० कार क्र. एमएच ०४ डीवाय १३३५ किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असा एकुण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरो पीचे संजोग लीलाधर होले वय २३ वर्ष, रा. टिमकी, नागपुर हल्ली मुक्काम चणकापुर, खापरखेडा असे आहे. या प्रकरणातील सुरेंद्र उर्फ कल्लु लीलाधर होले, रा. टिमकी नागपुर हा अन्य संशयित आरोपी असुन त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडुन देण्यात आली आहे. जप्त मुद्देमाल व संबंधित कागद पत्रांसह आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्श नाखाली सपोनि विजय चनोर, पोहवा संजय बांते, पो हवा प्रमोद भोयर, पोहवा शैलेश यादव, पोहवा सतीश राठोड, पोना संजय बरोदिया, पोशी सम्राट वनपर्ती, पोशी अभिषेक देशमुख, चापोशी आशुतोष लांजेवार सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.