spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कंत्राटी कामगारांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – राजेश नाईक

– नागपूर परिमंडळ ‘शून्य अपघात’ करण्याचा संकल्प; नरखेड येथे कंत्राटी कामगारांशी मुख्य अभियंत्यांचा थेट संवाद

नरखेड :- महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील कंत्राटी कामगार हे प्रतिकूल परिस्थितीत प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगाराने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सुरक्षा साधनांचा योग्य वापर करावा आणि सुरक्षित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले.

नागपूर परिमंडळ ‘शून्य अपघात’ युक्त करण्याचा संकल्प असून, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारली जाणार नाही. कामगारांनी स्वतःची तसेच सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करूनच विद्युत कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महावितरणच्या काटोल विभागातील कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या, अडचणी व कामाशी संबंधित प्रश्न जाणून घेण्यासाठी नरखेड येथे बुधवारी १६ सप्टेंबर रोजी, विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधून त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी व विविध प्रश्नांची माहिती घेतली. यावेळी कंत्राटी कामगारांनी आपल्या कामाशी संबंधित विविध समस्या व अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या बाबींचा पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. तसेच कंत्राटी कामगारांना टूल किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर लहाने, सरचिटणीस, तांत्रिक कामगार युनियन (५०५९) तथा राज्याध्यक्ष, तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन (७२८) हे होते.

कार्यक्रमास संजय वाकडे, अधीक्षक अभियंता, नागपूर ग्रामीण, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक सोनगडे, उपकार्यकारी अभियंता पवन नंधरधने, तसेच जी.ए.डिजिटल प्रतिनिधी दिलीप टेंभुर्णे, राज्य सचिव प्रकाश निकम, केंद्रीय संघटक अरुण यावले, तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, राज्य उपाध्यक्ष धिरज घायवट यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गणेश बडगे, गिरीधर डहाणे, योगेश धांडे, निलेश चक्रपाणी, कुणाल जिचकार, मंगेश चिमोटे,पवन सौदागर,पराग रेवतकर,रवि सरोदे ,आकाश गुप्ता,गगन सहारे, लिलाधर ताजने, स्वप्निल रेवतकर,शुभम भोयर तसेच तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन (७२८) यांच्या वतीने करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.