spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्रभर चालक दिन उत्साहात; वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचा पुढाकार

– चालकांच्या योगदानाचा गौरव; विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

– आरटीओ अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर :- वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चालकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी, चालक दिन महाराष्ट्रभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन यांच्या पुढाकाराने राज्यातील विविध ठिकाणी चालक दिनाचे आयोजन करण्यात आले. चालक हा केवळ वाहन चालविणारा व्यक्ती नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारा महत्त्वाचा घटक आहे. दिवस- रात्र, ऊन- पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या चालकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान व त्यांच्या अडचणींबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात संतोष चांदेकर, अनंता पुरी, अली हुसेन, शरीफ शेख, गजानन वनसकर, संदीप कावळे, भीमेश गजभिये तसेच आरटीओ अधिकारी यांच्यासह विविध मान्यवर व चालक बांधव सहभागी झाले होते. यावेळी चालकांच्या सुरक्षितते बरोबरच वाहतूक नियमांचे पालन, वाहन चालविताना संयम, रस्ते सुरक्षेचे महत्त्व आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.चालक दिनाच्या माध्यमातून चालकांच्या श्रमांचा सन्मान करण्या सोबतच त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक योगदानाची जाणीव समाजाला करून देण्यात आली. महाराष्ट्रभर झालेल्या या उपक्रमाला चालक बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.