spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवात तुमसर पोलिसांची धडक कारवाई: कुख्यात गुंड ‘डिकरा’ वर एम.पी.डी.ए.अंतर्गत कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

हंसराज, भंडारा तुमसर :- गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर धडक मोहीम उघडली आहे. तुमसर परिसरातील धोकादायक गुंड आकाश उर्फ डिकरा रमेश महालगावे (वय ३० वर्षे, रा. अभ्यंकर नगर, तुमसर) याच्यावर ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) कायद्यान्वये कारवाई करून त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आकाश उर्फ डिकरा हा २०२० पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून, त्याच्यावर तुमसर, गोबरवाही, भंडारा व लाखनी पोलीस ठाण्यांत खून, दुखापत, अग्निशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणे, शिवीगाळ, जुगार आणि परिसरात दहशत माजविणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता.

त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार तुमसर पोलीस ठाण्यातर्फे एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी आकाश उर्फ डिकरा यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर) शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पो.नि. आघाव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम तसेच पोलीस अंमलदार रामटेके, कठाने, तनपुरे, चौधरी, झंझाळ, बडदे, गिऱ्हेपुंजे, बावणे आणि दमाहे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.