spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

– ५३ वर्षीय आरोपी जुनी कामठी पोलिसांच्या स्वाधीन

कामठी :- अमली पदार्थविरोधी कारवाईला गती देत नागपूर अमली पदार्थ विरोधी ट्रान्सपोर्ट विभागाच्या पथकाने एनडीपीएस कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. जितेंद्र प्यारेलाल वर्मा (वय ५३, रा. फुकट नगर, कांद्री, ता. कामठी, पोलीस ठाणे कन्हान, नागपूर ग्रामीण) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी जितेंद्र वर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ कायदा (एनडीपीएस) कलम ८(क), २२(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू होती. अमली पदार्थ विरोधी ट्रान्सपोर्ट विभागाच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने शोधमोहीम राबवून अखेर आरोपी वर्मा याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थविषयक गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या पोलिसांच्या कार्यवाहीला बळ मिळाले आहे.

ही कारवाई श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कडू, पोलीस हवालदार प्रशांत सलाम, पोलीस अंमलदार अंकुश गजभिये, महिला पोलीस अंमलदार हिताक्षी नगराळे, महिला पोलीस अंमलदार रेखा टप्पे व चालक पोलीस अंमलदार नितुल सावजी यांच्या पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.