किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे सेवा संकल्प दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक वासुदेव भुते मार्गदर्शनाखाली पार पडला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात पर्यावरण संरक्षण, पाणी वाचवा-जीवन वाचवा, स्वच्छ भारत, झाडे लावा आणि चंद्रयान या विषयांवर आकर्षक रांगोळी काढून जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून सेवेचा संकल्प घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे, राजेश रोहाड, सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, संगीता आंबिलढुके, ज्योती आंबिलढुके, पुष्पा उके, उमेश उके, रंजना उके यांनी परिश्रम घेतले.





