spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजनी येथे रक्तदान शिबिर संपन्न

कामठी :- तालुक्यातील आजनी येथे गणेश उत्सवानिमित्त रविवार दिनांक २० सप्टेंबर रोजी श्री ची इच्छा गणपती देवस्थान परिसरात गावातील नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, रेणूका क्रीडा मंडळ, सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालय आणि इतर सहकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार देवराव रडके यांच्या हस्ते रक्तदूत रामचंद्र देवतळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भगवंतराव रडके, बळवंतराव रडके, माजी सभापती उमेश रडके, तुषार रडके, सरपंच हेमराज दवंडे, गणपत झलके, मोतीराम इंगोले, अनिकेत इंगोले, बाबूराव धंदरे, नंदलाल पाली, कामरान , घनश्याम चकोले, विजय वांढरे, घोडे गुरुजी, निखिल विघे, विनोद वाट, तुकाराम उकेबोंद्रे, प्रफुल्ल रडके, धर्मराज हेटे, गजेंद्र वाट, सुधाकर विघे, विजय वानखेडे, चुडामण वाणी, अमर वानखेडे, डोमाजी पाटील, श्यामू पारधी, नारायण पारेकर, प्यारेलाल चौधरी, शेषराव बोंबाटे, शिवशंकर वांढरे, आकाश देवतळे, राजेश वांढरे, जागेश रहांगडाले, मनोहर हेटे, अभिषेक फुकट यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या शिबिराकरिता नवयुवक युवा मंडळ, लीलाधर दवंडे आणि मोहसीन खान यांनी अर्थ सहाय्य केले.

या शिबिरात माधुरी रहांगडाले या महिलेसह ३१ जणांनी रक्तदान करून सेवा दिली. संकलन लाईफ लाईन रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.