spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी विरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या ५८ वर्षीय आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७५ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता पीडित मुलगी दुकानातून घरी परतत असताना संशयिताने तिला आवाज देऊन जवळ बोलावले. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

आरोपी हा नातेवाईक असल्याने तसेच कौटुंबिक परिस्थितीमुळे घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली नव्हती. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मुलीच्या वडिलांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीकडे विचारणा केली. त्यानंतर तिच्या आईने २० सप्टेंबर रोजी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.