spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मानोरी येथील युवतीचा विनयभंग

– आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश ?

बेला :- सिरसी रस्त्यावरील मानोरी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीस घरी एकटी असल्याचे पाहून गावातील आरोपी युवकाने अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. पिडीतेच्या तक्रारीवरून बेला पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.मात्र,आरोपीला पकडण्यात अद्याप यश आले नाही. त्यामुळे पोलिसांचे कार्यप्रणालीप्रती विविध शंका कुशंका व्यक्त होत आहे.

पिडीत युवती पिपरा येथे शिक्षिकेची खाजगी नोकरी करते. ती आई व आजोबासह मानोरी येथे राहते.१८ सप्टेंबरला सुट्टी असल्यामुळे घरी झाडझुड करताना ती एकटीच असल्याचे पाहून गावातील महेश भास्कर अराडे (२४ वर्ष) याने घरात येऊन पीडित तरुणीला पकडले व अश्लील चाळे केले. प्राप्त तक्रारीवरून बेला पोलिसांनी आरोपी विरुद्ध बी एन एस३३१(३) व ७४ कलमान्वये गुन्हा नोंदवला असून सिर्सि पोलीस चौकीचे बीट जमादार असलम नौरंगाबादे सदर गुन्ह्याचा तपास करत आहे. गावातून गायब झाल्यामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दरम्यान, यावरून गावात विविध तर्कवितर्क सुरू आहे.

-प्रतिक्रिया -आरोपीला पकडण्यासाठी मानोरी येथे गेलो असता तो घरी मिळाला नाही. ब्रह्मपुरी येथे जावयाकडे गेला असल्याचे समजले.आरोपीशी फोनवर बोलणे झाले आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

असलम नौरंगाबादे बीट जमादार सिरसी.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.