किशोर साहू, मौदा :- भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम वृंदावन लॉनच्या बाजूला, मौद्याचा महाराजा गणेश उत्सव मंडळ, मौदा येथे भारतीय जनता पार्टी ,भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपा महिला आघाडी च्या माध्यमातून उत्साहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला टेकचंद सावरकर माजी आमदार, राजा तिडके नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा,निशा सावरकर माजी अध्यक्ष जि. प. नागपूर, नरेश मोटघरे उपाध्यक्ष जिल्हा ग्रामीण,रमेश कुंभलकर अध्यक्ष भाजपा शहर, मोरेश्वर सोरते नगरसेवक न. प. मौदा,शरद भोयर भाजपा नेते,उमेश गभने नगरसेवक, न. प. मौदा,राहुल पोटभरे नगरसेवक न. प. मौदा, मुन्नाभाऊ चलसाणी माजी नगरसेवक, शिवराज माथुरकर महामंत्री भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण,विरेंद्र पायतोडे उपाध्यक्ष भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण, कल्पना मानकर अध्यक्ष भाजपा महिला आघाडी,शालिनी कुहीकर माजी नगरसेवक चंद्रशेखर सावरकर ,विजय हटवार,मोरेश्वर राजगिरे,संजय मदणकर,धनराज चाफले पृथ्वीराज गुजर,चंद्रकांत पोटभरे,सौरभ खरवडे,सुरज पराते,अमेय चेडगे,अभिजित आंबूलकर,भूपेश सावरकर सह भाजपा, भाजयुमो व भाजपा महिला आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा हाच संकल्प…. राष्ट्रनिर्माण हाच ध्यास अशा घोषणा देत सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.





