Home Latest News पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे  29 सप्टेंबर रोजी होणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार...

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे  29 सप्टेंबर रोजी होणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित

0
8

हंसराज भंडारा : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

रोजगार महाकुंभाची नवीन तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालये, उमेदवार व इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी, उमेदवारांची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर सर्व तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगित ठेवावी.

रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.