कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे एका विवाहित इसमाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान घडली असून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव रतन देवाजी रंगारी वय 55 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच घरमंडळींनी त्वरित कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शविच्छेदन करून मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मात्र आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठिमागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.








