spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेल्यात होणार विदर्भाची पहिली सह्याद्री देवराई

– अभिनेता सयाजी शिंदे यांचे हस्ते वृक्षारोपण 

बेला :- निसर्ग संवर्धनाचे ध्येय बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील पहिली सह्याद्री देवराई बेला येथे निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील ती ४१ वी देवराई ठरणार आहे. यानिमित्त देवराईचे संस्थापक सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रेल्वे पोलीस उपअधीक्षक व देवराई समन्वयक पांडुरंग सोनवणे, लॉयन्स क्लबचे डॉ. विनोद जैस्वाल, विलास साखरे, सरपंच अरुण बालपांडे, ठाणेदार उमेश नासरे, प्राचार्य नितीन पुरी, राजेंद्र तिडके, ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे विद्यार्थी, व असंख्य नागरिक उपस्थित होते.

बेला गावाजवळ वनविभागाचे नागझरी क्षेत्रात ही देवराई होत आहे. परंतु,तांत्रिक अडचणीमुळे तिथे वृक्षारोपण करण्यात आले नाही. वनविभागाचा अडथळा लवकरच दूर करण्यात येईल.असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.मात्र, विद्यार्थ्यांनी काढलेल्या बँड,लेझीमचे वृक्षदिंडीसह अभिनेता शिंदे यांनी फेरफटका मारून गावात वृक्षारोपण केले. बेला येथे निर्माण होणाऱ्या सह्याद्री देवराईला नावलौकिक मिळवून देऊ.झाडे जगवण्याकरता अथक परिश्रम घेतले जाईल. असे आश्वासन सरपंच बालपांडे यांनी दिले.

 ‘ बेला ‘सह बाराशे वृक्षारोपण

गावाचे नावावरून मी या गावात सह्याद्री देवराई कडून बेलाचे पाचशे झाडे लावायला देणार आहे. इतरही वृक्षांसह बाराशे झाडे लावून बेला देवराई निसर्ग संपन्न केल्या जाईल. त्यासाठी मी पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे. झाडे कधीच भेदभाव करत नाही. सर्वांना सावली देते.झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन व बरेच काही मिळते.उन्हाचे चटके जाणवत नाही. झाड आपल्या परिवारातील सदस्य आहे. अशी प्रत्येकाची भावना असली पाहिजे. सर्वांनी झाडे लावावी,जगवावी व वाढवावी सुद्धा. असे आवाहन अभिनेता व देवराईचे सयाजी शिंदे यांनी यावेळी केले. ग्रामसचिवालय समोर आयोजित वृक्षारोपण सोहळ्याचे सूत्रसंचालन ग्रा.पं.सदस्य सुरज कांबळे यांनी केले. उपसरपंच प्रशांत लांबट यांनी आभार मानले.

Popular Articles