spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अर्णव सिंघनजुडेचे दैदिप्यमान यश; विभागीय स्पर्धेसाठी निवड

– स्व. निर्धन पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालय, लाखनीच्या विद्यार्थ्याची उत्तुंग कामगिरी

हंसराज,लाखनी :- महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धेत लाखनी येथील स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता ११ वी चा विद्यार्थी अर्णव उमेश सिंघनजुडे याने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशासह त्याची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर स्पर्धा २६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या २०० मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात अर्णव सिंघनजुडे याने अवघ्या ४ मिनिटे २५.४४ सेकंदांची (४:२५.४४) वेळ नोंदवून स्पर्धेत द्वितीय स्थान संपादन केले.

उत्कृष्ट जलतरण कौशल्याच्या जोरावर त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय अर्णवने आपले आई-वडील, मार्गदर्शक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिले आहे.

अर्णवच्या या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग, क्रीडा विभाग प्रमुख तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी विभागीय जलतरण स्पर्धेतही त्याने अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular Articles