किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांवर तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या विचारांवर प्रभावी भाषणे केली. शिक्षकांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानिमित्य विद्यार्थीसाठी वक्तृत्वस्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम क्रमांक स्वरा विजय हटवार, द्वितीय क्रमांक नव्या तलमले व आर्या आंबीलढुके,तृतीय क्रमांक आराध्या देशमुख व गुंजन आंबिलढुके या विद्यार्थिनींचा आला. या विद्यार्थीनींना बक्षिस देण्यात आले.त्यानंतर शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालक सभेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील उपक्रम व गुणवत्तावाढीवर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, सरपंच भारती संदीप आंबीलढुके, उपसरपंच रविंद्र ढोमणे, माजी उपसरपंच संदिप आंबीलढुके,केंद्रप्रमुख राजू आंबीलकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक वासुदेव भुते यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षकवृंदाने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद राजेश रोहाड , सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे, सुजाता बोधले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबीलढुके,ज्योती आंबीलढुके, पुष्पलता उके, उमेश उके यांनी विशेष परिश्रम घेतले.








