किशोर साहू, मौदा :-पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांवर तसेच स्वच्छतेचे महत्त्व यावर मनोगत व्यक्त केले. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकांनी महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि शिस्तीचे विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, उपाध्यक्ष शुभांगी आंबीलडुके, मुख्याध्यापक अनिल गडपायले, शिक्षकवृंद रविंद्र घुगे, परविन शेख, भारती साखरकर,प्रीती खंगार, संगीता बालकोटे, उकुड्डे, रुचीला खंडाईत व नेहा निमजे यांचा सक्रिय सहभाग व मार्गदर्शन लाभले.








