spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत रस्ता फुटपाथवरील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दुकानांवर कारवाईबाबत”

नागपूर :- महानगरपालिका धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि. 02/10/2026 ते 05/10/2026 रोजी नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हिस्लॉप कॉलेज रोड,VCA ग्राउंड परिसर, सिताबर्डी, झांसी राणी चौक, अंबाझरी रोड, व्हीएनआयटी परिसर, फुटाळा येथे कारवाई करण्यात आली, या कारवाईमुळे फुटपाथ आणि मुख्य रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई आयुक्त मनपा नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.

नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Popular Articles