कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रमानगर परिसरात एका 45 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गतरात्री घडली असून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव प्रवीण पामेश्वर बोरकर वय 45 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही .
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रवीण बोरकर याने अज्ञात कारणावरून राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास येताच घरमंडळीना एकच धक्का बसला .उपचारार्थ सदर इसमाला रॉय हॉस्पिटल येथे हलविण्यात आले मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले. पोलिसांनी सदर घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी साठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून आजनी मार्गावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी सदर घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्याचे गूढ रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे.








