– सार्वजनिक बाल विकास मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे केले कौतुक
कामठी :- कामठी शहरातील दुर्गा चौक, तेलीपुरा येथे सार्वजनिक बाल विकास मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळातर्फे विराजमान करण्यात आलेल्या श्री गणरायाचे नगर परिषद अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून कामठी शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या आगमनावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी अग्रवाल यांनी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व विधायक उपक्रमांची माहिती जाणून घेत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जोपासणारा उत्सव ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अक्षय पाटील, आदित्य पाटील, सुनील पमनानी, कपिल गायधने, विजय कोंडुलवार, श्रीकांत शेंदरे, मुकेश चकोले, आशुतोष अवस्थी, शुभम महाजन, प्रफुल पाटील, शेखर नाटकर, नयन पंचबुधे, दर्शन ढगले, विवेक शिंदे, वैभव पाटील, प्रशांत पाटील, अथर्व ढगले, प्रकाश आंबोने, कुणाल कोडवते, मथन महाजन, सोहम महाजन, लखन बावने, यश बावने, राकेश लोन्दासे, राजू कूडप्पा, विनोद आंबोने, गजानन ढगले यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.








