यवतमाळ :- दि. २९ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय, हर्जुना येथे व्हीजेएनटी समाजाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी एक विशेष सेवा शिबिर उत्साहात पार पडले. ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.
या शिबिराचे नियोजन व मार्गदर्शन मंडळ अधिकारी नितीन आनंदराव खरोडे आणि ग्राम महसूल अधिकारी प्रियंका येईलवाड यांनी केले. शिबिरादरम्यान नागरिकांना उत्पन्न दाखले, बांधकाम प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि जिवंत सातबारा चे वाटप करण्यात आले.
शासकीय योजना आणि आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने 73 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.








