spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा येथे सेवा ज्योति यात्रा

किशोर साहू, मौदा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या कार्यकाळानिमित्त कामठी विधानसभा अंतर्गत मौदा येथे ‘सेवा ज्योति’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाईव्ह संबोधनाचा सर्वांनी लाभ घेतला.

कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा,संजयजी भेंडे आमदार, आनंदराव राऊत जिलाध्यक्ष, भाजपा नागपूर जिल्हा ,टेकचंद सावरकर माजी आमदार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सेवाकार्याचा गौरव आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारी ही ‘सेवा ज्योति यात्रा’ निश्चितच प्रेरणादायी ठरल्याचे मत माजी तालुका भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Popular Articles