spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धानला केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

किशोर साहू, मौदा :- धानला केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख राजू आंबीलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून शालीका पवार, प्रणाली गोपाले, वासुदेव भुते (मुख्याध्यापक, पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव), भास्कर पवार (मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा, धानला), गजानन बेले (मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पिंपरी) उपस्थित होते.

केंद्रप्रमुख राजू आंबीलकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शिक्षण परिषदेचे महत्त्व सर्व शिक्षकांना समजावून सांगितले.

मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून रंजना बोरकर यांनी मार्गदर्शन केले.गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुधीर कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

या शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी धानला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांनी परिश्रम घेतले.

धानला केंद्रातून बदली होऊन गेलेल्या जि.प. प्राथमिक शाळा, चारभा मुख्याध्यापिका वर्षा पाटील यांचा केंद्राच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भोवरी येथील शिक्षिका पठाण यांनी कवितारूपी गीतामधून त्यांच्या कार्याचे वर्णन केले, तर शिक्षिका रंजना बोरकर यांनी दोन वर्षाच्या सहवासाचे सुंदर वर्णन केले.

या परिषदेत धानला केंद्रातील सर्व शाळा निपुण कशा होतील याचे सूक्ष्म नियोजन सर्व मुख्याध्यापकांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वनिता दंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका रंजना बोरकर यांनी मानले.

Popular Articles