spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

– स्वर्गीय श्रावणजी रामटेककर व स्वर्गीय देवकाबाई रामटेककर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपक्रम; नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, औषधवाटप व चष्म्यांचे वितरण

नागपूर :- जैन कलार समाजाच्या वतीने स्वर्गीय श्रावणजी रामटेककर व स्व. देवकाबाई रामटेककर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळ, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ व जिल्हा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग, नागपूर येथील जैन कलार समाज भवनात हे शिबिर पार पडले. या शिबिरासाठी आयोजकांना प्रायोजक व समाजातील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. या महाआरोग्य शिबिराचे प्रायोजक त्रिलोकजी श्रावणजी रामटेककर यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जैन कलार समाज मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, प्रयासचे संस्थापक अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हा समिती नागपूरचे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, संस्थापक अध्यक्ष किरण गोसेवाडे, उपाध्यक्ष शशिकांत समर्थ, विलास हरडे तसेच राजाभाऊ टाकसाळे यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रायोजक त्रिलोक श्रावणजी रामटेककर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिबिरात इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. रहांगडाले, डॉ.त्र्यंबक बुरकुले तसेच त्यांच्या वैद्यकीय चमूने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी गरजू नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच मंडळाच्या वतीने मोफत चष्म्यांचे वितरणही करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव विजय समर्थ यांनी केले, तर संचालन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मासुरकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी दत्तात्रय हरडे, राजेश समर्थ, अजय हेटेवार, दामोदर आदमने, अशोक पेशणे, अरुण रहाटे, राजीव फटिंग, जयंत हरडे, डॉ.रवींद्र बेरागडे, दिलीप डाबरे, राजू बारूरकर, भूषण हरडे यांच्यासह रजनी चिमूरकर, कुसुम भरणे, आशाताई समर्थ, नंदा हरडे तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले. समाजातील ज्येष्ठ नागरिक व गरजू व्यक्तींना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Popular Articles