– तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांनी घेतली तक्रारीची दखल
– चाचेर येथील श्री गुरुदेव कृषी सेवा केंद्र येथील प्रकार
किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता. १० ऑक्टोबर) ला कोदामेंढी येथे राहणारे व कोदामेंढी, अरोली ,चाचेर, तारसा येथील विविध येथील विविध मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिकाचे एजंट व पत्रकार किशोर साहू दुपारी २ वाजेदरम्यान दरम्यान श्री गुरुदेव कृषी सेवा केंद्र चाचेर येथे ॲग्रोवनच्या अंक त्यांच्या दुकानात देण्यासाठी गेले असता, कृषी संचालक किशोर आंबिलढूके यांनी”आज पेपरला खूप उशीर झाला आहे आज तुम्ही पेपर टाकू नका”, असे म्हणताच एजंट किशोर साहू दुकानातून वृत्तपत्र घेऊन परत जात असताना, श्री गुरुदेव कृषी केंद्र संचालक किशोर आंबिलढूके यांनी साहू यांना पुन्हा दुकानात थांबविले व तुम्ही ॲग्रोवनचे अंक हातात धरून ठेवा मी तुमची फोटो काढून तुमच्या साहेबांना पाठवतो, उद्यापासून तुमचा पेपर बंद” असे म्हणत कृषी संचालक आंबीलढूके यांनी फोटो काढली. पत्रकार म्हणून साहू यांनी त्यांना त्यांच्या रेड बोर्ड दुपारी दोन वाजता दुकान सुरू असूनही संपूर्ण पुसलेला असल्याने विचारपूस केली असता मी आजच रेड बोर्ड पुसला असल्याचे त्यांनी सांगितले. रेडबोर्डची फोटो काढण्यासाठी साहू यांनी खिशातून मोबाईल काढले असता, आंबिलढूके यांनी रेड बोर्ड दुकानाच्या आत मध्ये लपवून ठेवला. लपवताना फोटो काढले असता ते धावत आले, साहू यांच्या मोबाईल हिसकावला व फोटो डिलीट केले. याबाबत साहू यांनी तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर सतत दोनदा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.त्यांच्या व्हाट्सअप नंबरवर याबाबत तक्रार पाठवली. तक्रार वाचल्यानंतर त्यांनी ओके असा रिप्लाय दिला. अखेर आज रविवार (ता. ११ ऑक्टोबर)ला कृषी साठ्याची अद्यावत व दराबाबत माहिती असलेला शनिवारला दुकानात लपवून ठेवलेला फलक बाहेर काढून अद्यावत माहितीसह लावल्याचे चाचेर येथे वृत्तवाटप करताना रस्त्यावरून त्यांच्या दुकानासमोरून जाताना दिसले.








