spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

व्हीजेएनटी प्रवर्गासाठी विशेष महसूल शिबिर संपन्न

– सेवा संकल्प अभियान

यवतमाळ :- सेवा संकल्प अभियानातंर्गत यवतमाळ येथील जामवाडी गावात १२ ऑक्टोबर रोजी व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जामवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडले.

महसूल विभागामार्फत आयोजित या शिबिरामध्ये गावातील सुमारे ६० लाभार्थ्यांनी उपस्थित राहून विविध शासकीय सुविधांचा लाभ घेतला. या शिबिरात महिला शेतकरी नोंदणी, सात बारा वाटप, जिवंत सात बारा आणि उत्पन्नाचे दाखले देणे यांसारख्या प्रमुख सेवा नागरिकांना जागेवरच उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिराचे नियोजन व संचालन मंडळ अधिकारी नितीन खरोडे आणि ग्राम महसूल अधिकारी राहुल कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले आणि कागदपत्रे मिळवणे सोपे झाले आहे.

Popular Articles