spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ओमेगा-3 शरीरासाठी का आवश्यक ?

– ओमेगा-3 साठी आहारात कोणते बदल करायचे ?

उत्तम आरोग्य राखण्यासाठी आहाराबाबत जागरूक राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. आपला आहार असा असावा की, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेली बहुतेक पोषक तत्वे सहजपणे मिळतील.

शरीराच्या उत्तम कार्यासाठी केवळ प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजंच नव्हे, तर हेल्दी फॅट्सचीही म्हणजे आरोग्यासाठी उपयुक्त मेदाची आवश्यकता असते. ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स हा पोषक घटक हृदयापासून ते मेंदूपर्यंतच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. शरीर स्वतःहून त्यांची निर्मिती करू शकत नाही, त्यामुळे ते आहारातून मिळवणं आवश्यक असतं.

ओमेगा-3 हे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीरातील दाह म्हणजे inflammation कमी करण्यासही मदत करतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओमेगा-3 ची गरज आहारातून सहजपणे पूर्ण केली जाऊ शकते. मासे, अक्रोड, जवस आणि चिया सीड्स हे ओमेगा-3 चे उत्तम स्रोत आहेत. ओमेगा-3 मुळे रक्तातील चरबीचा एक प्रकार असलेल्या ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासही मदत होते. याव्यतिरिक्त, ओमेगा-3 शरीरासाठी महत्त्वाचं का मानलं जातं, पाहूया.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर – ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी ओमेगा-3 प्रभावी ठरतं असं अभ्यासातून दिसून आलं आहे. संतुलित प्रमाणात नियमितपणे मासे खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. काही संशोधनानुसार, पुरेसं ओमेगा 3 सेवन केल्यानं रक्तदाब कमी करण्यासही मदत होऊ शकते. पण यासाठी मिठाचं प्रमाण कमी करणं, नियमित व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं या गोष्टीही तितक्याच आवश्यक आहेत. ओमेगा-3 चे फायदे मेंदूच्या पेशी आणि डोळ्यांच्या रेटिनातही दिसून आले आहेत. गर्भधारणा आणि बालकाच्या विकासादरम्यान ओमेगा-3 अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं.

डीएचए म्हणजेच DHA – docosahexaenoic acid हा ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा एक प्रमुख प्रकार असून, तो मेंदू आणि डोळ्यांच्या रेटिनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मेंदूचं सामान्य कार्य आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. मेंदूच्या पेशींची रचना टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांमधील संवाद सुधारण्यासाठी ओमेगा-3 मदत करतं. डोळ्यांच्या पडद्याच्या नियमित कार्यासाठीही ओमेगा-3 उपयुक्त आहे.

Inflammation कमी करण्यासाठी फायदे – शरीरातील inflammation म्हणजेच दाह किंवा सूज संबंधित प्रक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स फायदेशीर ठरू शकतात. chronic inflammation मुळे हृदयविकार आणि इतर काही दीर्घकालीन आजारांचा धोका वाढू शकतो.

संधिवात म्हणजे rheumatoid arthritis यांसारख्या दाहक स्थिती कमी करण्यासाठी, तसंच सांधेदुखी आणि सांध्यांमधील ताठरपणा कमी करण्यासाठी ओमेगा-3 मदत करू शकते असं अभ्यासातून दिसून आलं आहे. ओमेगा-3 आहारात समाविष्ट करण्यासाठी फॅटी फिश म्हणजे चरबीयुक्त मासे, अक्रोड, जवस आणि चिया सीड्स यांचा समावेश करू शकता.

Popular Articles