– प्रथम पुरस्कार ६१ हजार रुपये,१५ वर्षांपासून परंपरा कायम
बुटीबोरी :- दुर्गा माता मंदिराच्या मैदानावर सतीश जयस्वाल यांच्या नेतृत्वात मराठा लायन्स रास गरबा महोत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
मराठा लायन्स रास गरबा महोत्सवाची परंपरा गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या आयोजनाने शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाबद्दल गरबाप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.यंदा गरबा स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ६१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
गेल्या दीड दशकापासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पुढे नेली जात आहे. मराठा लायन्स रास गरबा महोत्सव २०२६ हा यंदाच्या नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.








